पान:इंदिरा.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१११ साक्या. इतुक्यामाजी सांपडलों मी सत्यध्वज - नृप - हस्तीं; चंद्रकेतुला मारशील तूं हे पडली त्या भीती; आणुनि सेना तो, । वेढा तव नगरा देतो.” १२४ पत्र दुजें तें लिहिलें होतें सत्यध्वज नृपतीनें; योग्य शब्द तयिं, विचार करुनी योजियलेचि तयानें:- “वेढा नगरींचा । गणिं सुतरक्षणार्थ साचा. १२५ - श्लोक. माझा पुत्र असे तुझ्या नगरिं तो, केशामिं त्या होउ ना कल्पांतीं कशिही कुणेपरि इजा, ऐशी करीं योजना; येवों दे परतोनि त्या पुनरपि ग्रामीं सुखें आपुल्या; दे त्यातें कर आपुला, घडविं तैं कार्याप्रती योजिल्या. १२६ पद. ( "तुझां तो शंकर सुखकर हो" - या प्रबंधाचे चालीवर. कुमारी ! कुमाराप्रति कर दे; ॥ निशिदिनीं हृदयिं मनिं आननिं, नृपसुते, गुणमये, सुंदरे, प्रिय बहू वससि मम सुताच्या सदागे. ॥ ध्रु० ॥ कुमारा० | रूप तव अति सुचिर तोषद मानुनी, ग्रामा धामा त्यजुनी, पातला अंगना- शुद्धि- प्रति सुहृदांसवें शौर्ये, कामिनी - वसन-भार लेवुनी, संकटा न जुमा- नुनी, योजनें उल्लंघुनी, वीर, सुंदर योग्य तरुणी आला वराया प्रमोदें. ॥ कुमारी ! ।। १ ।। १२७