पान:इंदिरा.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० नेत्रवर्ण तैं लाल जाहला, कोप तन्मनीं शीघ्र दाटला. १९८ तदा थोर आवेश आला तियेला, तनू कंपली, गाल आरक्त झाला; बहू दुःख होवोनि कोपानि पेटे, मुखीं शब्द ये ना, तिचा कंठ दाटे. ११९ फिरवुनी मुखा चंद्रकेतुला निरखिलें; उभा जेथ राहिला, चुरुनि पत्रिका तेथ फेंकिल्या; उचलुनी तयें हातिं घेतल्या. १२० मुळिं जरि वदली ना शब्दही ती मुखानें, तरि समजुनि हेतू इंदिरेचा तयानें, उघडुनि चुरलेल्या पत्रिका वाचियेल्या; पितर उभयतांचे यांहिं त्या पाठवील्या. १२१ साकी. पहिलि पत्रिका गजेंद्ररायें कन्ये लिहिली होती, चंद्रकेतुच्या घाबरलेल्या पडतां जनका हातीं. कन्ये लिहिलें कीं । “न घडो दुलौकिक लोकीं.” १२२ पद. जिल्हा झिंजोटी - ताल त्रिवट. (“चंद्रकेतु रविवंशीं” — या चालीवर. ) "नृपसुता धाडिलें जैं तुजपाशीं कन्यके ! नगरींचे नियम तूझ्या मज नव्हते ठाउके; बहु भ्यालों अंतरी कीं प्राणा तो तैं मुके; झणि आलों सांगण्या कीं तैं मरणा तो चुके. १२३