पान:इंदिरा.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ पळाली असे येथुनी साह्यकर्त्री, असे मूळ नाशासि सत्कार्य-हंत्री; कसें तोंड दावील ती येथ आज ? नुरे काय तीतें मुळीं कांहिं लाज ! १०७ आर्या. शशिवदना सांगातें गेलीसे जाण कमलजा खास ! वरिलें असेल आजी, अथवा वरणार ती पुढे त्यास. १०८ श्लोक. अग! इथ उरलीसें एकली या स्थळीं मी, तन मन धन म्यांची वेंचलेंसे सुकाम; बिघडलि कृति ऐशी, क्रोध तैं पावशील; मजवरि सकळांचे दोष तूं घालशील. १०९ परी जाणशी तूं झटें येथ केवीं, तुझ्या कार्यि मी केविं मञ्चित्त लावीं; असे दोष माझा तरी लाविं वाटे, पहा गे! पुढे काय होतील तोटे ! ११० चहूंकडे होइल ती फजीती, पडूं नरांच्या मुखि सर्व रीती; पुरें जगीं होइल हांसणें तें:- 'करूं शकूं ना धरूं जें किं हातें." १११ तदनु इंदिरा तीस बोलली:- "शपथ वाहिली आजि मोडिली; गमन तूं करीं पाहिजे तिथे; मुकशि कन्यका, ठेवुं ती इथे." ११२