पान:इंदिरा.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०७ सांगावें तुजलाचि वृत्त अवधें, जावें दुजें गे कुठे ! होतें येत तुझ्याकडे, मनिं परी संदेह मोठा उठे; वाटे तूं ह्मणशील 'गे कमलजे वृत्तांत सारा पुसूंं; ' ऐसें जाहलिया, मनीं समजलें, दोघीहि अंतीं फसूं. १०१ त्वां जावोनि तिला जरी पुसियलें, नन्ना तरी ती धरी; नानारीति तुला बहू शिकवुनी तूझ्या शिरे अंतरीं; त्वां तीतें पुसिलें जरी, धरिल ती नन्ना तरी सत्वरीं, अर्जीनें उठवील ती पुरि दया भोळ्या तुझ्या अंतरीं. बोलोनी तुशिं गोड गोड वचनें केल्या कृतीची क्षमा ती मागेल, तदा ह्मणेल झणि कीं 'ही पावलीसे भ्रमा.' १०२ सांगेल कीं 'ही बहु द्वेषकारी आहे, हाणोनी कृति या प्रकारीं हिची असे ऐशि दगा कराया, उच्चा पदातें मम या हराया !' १०३ राहें भिऊनी जरि या अपेष्टे, आल्यें असें मी इथ फार कष्टें; तीन्हींवरी ठेवुनि योग्य दृष्टी, म्यां घालवीली बहु रात्र कष्ट्री ! १०४ येवोनि पाहें तंब गे ! दुपारीं गेली पहाडास तुझी सवारी; होती तिथे गेलि तुझ्यासवें ती, 'सांगेल सारें' झटलें स्वचित्तीं. १०५ असे काय ठावें तुला सर्व वृत्त ? कशी येथ आली महा-दुष्ट जात ? इथे कासया पातलें हें त्रिकूट ? स्वलग्नें इथे पाडण्यालागिं तूट ? १०६