पान:इंदिरा.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ साक्या. आजवरी हें सोसुनि राहें, धरुनी पुढची आशा, कधिं तरि वळशिल मजवरती तूं, करिशिल ना मम नाशा, आहे निष्ठा ही ! । चित्तीं इष्ट तुझें वाहीं. ९५. तुजविण नाहीं या सत्कार्या त्राती अन्य कुठें ती! जावो सिद्धी, धरिलें जें हें महत्कार्य गे हातीं ! आहे निष्ठा ही, । चित्तीं इष्ट तुझें वाहीं ! ९६ दिंडी. परी प्रेम तुझें कमलजेवरी तें अधिक झालें, हें स्पष्ट कळुनि येतें; नवी येई स्त्री इथे शिकायाला, कमलजेशीं तूं धाडिशी तियेला. ९७ असे परदेशी अल्पविद्य स्त्री ती, अल्पसंतोषी कमलजा विजाती; तुझ्या गांवचि मी बहूतां दिसांची सोबतिण, तव शुभ इच्छिणारि साची. ९८ तुझ्या हातीं मम कार्य-श्रेय आहे, दंड भोगीं मी ह्मणोनीच का हे ? अंतिं ओळखिशिल, काय रूप आहे कमलजेचें तें; हीच वाट पाहें. ९९ श्लोक. आले गे इतुक्यामधींच वृक हे, कां येति, ना सांगवे, तोंडा लावुनि तोंड ती गतदिनीं बैसे तयांच्या सर्वे; जाणें, पूर्ण तिघांसि ती वळखिते, तीच्याच ते गांवचे; रात्रीं ओळखिलें तयां, तदुपरी कांहीं न मातें सुचे. १००