पान:इंदिरा.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०५ मता घेत होतीस, जें वंद्य नित्य; सदा बोलल्यें, वाटलें तेंचि सत्य; नसे हालली माझियेवीण काडी; वदें, जें पडे भाग तें तूज-पाडीं. ८९ तुला वाढवीलें, तुला खेळवीलें, सुधातुल्य गे ! ज्ञान म्यां पाजियेलें, तुला पोटिंच्या अर्भका ह्या समान सदा रक्षियेलें उराशीं धरोन. ९० जरी जन्मदात्री दुजी गे असे ती, खरी माय मी; वाढवीलें स्वहातीं; तुला गोष्टि सांगोनि मी उन्नतीच्या, दिलें शिक्षणा पूर्ण उच्चा प्रतीच्या ९१ परी वेळ ती पालटोनी ग गेली, प्रतिस्पर्धि जेव्हां स्थळीं येथ आली; तिनें काळिजा तूझिया चोरियेलें तुझें चित्त गे आपणाठायें नेलें. ९२ हळुहळु मग तूं गे दूर केलेंस मातें; मन मम फुटताहे ऐशिया दुष्ट घातें; उमजत मज नाहीं काय अन्याय झाला ? उभविलि कृति ऐशा यावया का फळाला? ९३ सुरळित तव जावा हेतु अंतास गे हा, ह्मणुनि त्यजुनि सान्यां इष्टमित्रांस गेहा, तव पथ धरिला म्यां, सर्व सोडोनि आलें; सकळ मुकुनि आतां, योजिलें कार्य गेलें ! ९४