पान:इंदिरा.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ जसा गोड अंगीं सदा इक्षुदंड, जरी कारल्या आळिं वाढे उदंड, तसा रे शशी तो, जरी मद्य प्याला, तरी हाडिंचा नाहिं सद्वर्ण गेला. " ८३ साकी. ऐसें मित्रा बोलत आहे, आल्या इतुक्यामाजी, दोन बायका, ह्मणति त्यांजला-"नांवें हो सांगा जी;" धरिती कमलाक्षा, । वाटे द्याया की शिक्षा. ८४ धांव घेतली राजकुमारें, वाटे निसटुनि गेला, पळतां पायीं कंटक रुतला, काढाया तो ठेला; जर्जर तैं झाला, । बायां-हातीं सांपडला. ८५ श्लोक. नेलें राजकुमारि सन्मुख तयां दोघां क्षणाभीतरीं, जेथें बैसलि होति राजतनया विस्तीर्णशा मंदिरीं; भाळीं एक हिरा विशाळ तिचिया भांगावरी गोंविला, खांदे लांब सुकेश कृष्ण पडले, त्यां-अप्रिं तो शोभला. ८६ दिंडी, तिच्या पायांशीं पडे मंजुळा ती, वामभागी मधुकरी उभी होती, तिच्या सन्मुख ती शशिकला उभेली, काय ऐका तयि इंदिरे ह्मणाली: -- ८७ श्लोक. "जुना काळ गेला तदा इंदिरे ! तीं दुजे रीति कार्ये इथे होत होतीं; तुला शब्द माझा सदा मान्य होता, विचारीत होतीस तूं येत जातां. ८८