पान:इंदिरा.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०३ दिंडी. कुठे आहे शशिवदन, कमलजा ती ? काय गेले द्वय पळोनि सांगातीं ? हीच त्याची रे भीति मला होती; उगा धरिलें हें महत्कार्य हातीं ! " ७७ श्लोक. ह्मणे चंद्रकेतू "उगा दोष देशी; नसे मित्र तो एवढा दुष्टराशी; अरे प्राशुनी मद्य तो मस्त झाला, तरी तद्गुणा काय बा अंत आला ? ७८ न का मद्य सेवूनि कोणी कदाही सुखानंद घेवोनि मौजेंत राही ? पडे भूल त्यालागिं या स्त्रीजनांची, सुरेनें स्थिती पालटोनी मनाची. ७९ भ्रमें गाइलें पूर्ण शृंगार-भावा, तरी पापि केलें तयें का स्वजीवा ? ह्मणावें न जें स्त्रीपुढें तें ह्मणाला, ह्मणोनी सदा काय तो निंद्य झाला ? ८० बीभत्स याहूनिहि का नसे तें, अश्लाघ्य वाटे बहु जें मनातें ? गौणत्व का ना वचनीं कधीं गा, रोमांच आणी क्षणिं सर्व अंगा ? ८१ स्वयें हाडिं रे मूळचा चांगला तो; पळोनी कसा एकटा सांग जातो ? स्वभावें खुला तो, न कापट्यरूपी, कसा आपणां त्यागि तो या विलापीं? ८२