पान:इंदिरा.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ कमलजेविशीं जेविं इंदिरा पुसत बाळिला, तैं न उत्तरा मधुकरी करी; ना वदे, असे सकळ ठाउकें वृत्त वा नसे. ७१ मौन पाहुनी बाळिचें असें, लाजल्यामुळे म्लान जी दिसे, योग्यसा तदा अर्थ काढिला; वृत्ति बाळिची ठाउकी तिला. ७२ घाडी दासिंस शीघ्र तैं कमलजे पाचारण्या इंदिरा, येती त्या परतोनि; दासि ह्मणती 'धुंडीयलें मंदिरा, कोठें ना परि ती मिळे कमलजा; सोडूनि गेली असे; बागा शोधियल्या; न थांग परि तो लागे, न कोठें दिसे.' ७३ ह्मणे इंदिरा ऐकुनी ह्याचि वाचे:- 'धरा पोर, बाहेर टाका तियेचें; नको, झालि द्रोही जिची माय साची, नको खूण येथें मुळीं त्या स्त्रियेची.' ७४ शशिकलेसि बलावियलें असे सकळ हे पुसण्या 'घडलें कसें;' असुनि ठाउक, जें इथ जाहलें, न कथिलें, परि गुप्तचि ठेविलें. ७५ साकी. अशी चौकशी दर्बारीं ती मोठी आतां चाले; निसटुनि तेथुनि तुला भेटलों, योग्यचि मित्रा ! झाले; सांगें, जाशि कुठे ? । पडले विचार अजि मोठे ! ७६