पान:इंदिरा.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०१ साक्या. सरस्वतीचा ज्या द्वारावरि पुतळा साजत होता, कांचन नगरी पुन्हा पहातो शिरतो नृपसुत आतां, उद्यानीं गेला, । निराश ! गडबडला ! ६५ निमग्न असतां विचारिं अपुल्या फिरतांना उद्यान, तयें देखिलें कमलाक्षा तिथ, धरिलें त्या बाहूंनीं. बोले :- "कमलाक्षा, । झाली आशेची रक्षा.” ६६ दिंडी. तदा “मित्रा!” कमलाक्ष तो ह्मणाला:- "हळू बोल, किं ना ऐकुं ये कुणाला; शोधिताती ह्या नारि आपणाला; धरूं, दंडूं या बोलती तिघांला. ६७ मंदिरांतरिं इथ शोध चाललाहे, इंदिरा ती एकेक नार पाहे, पुसे प्रत्येकिस कोण काय जाणे; ह्मणे जी ती कीं त्रिवर्गासि नेणें. ६८ श्लोक. मधुकरि परि येतां राजकन्येपुढें ती, उठवित करुणेतें मानसीं पूर्ण रीती; अभिमुख उभि राहे मान घालोनि खालीं; प्रथम मुळिं न तेथें शब्दि कांहीं ह्मणाली. ६९ पुसे इंदिरा जैं तिला आग्रहानें, कथी जसें जाणिलें सर्व तीनें; ह्मणे स्पष्ट ना, माय कीं वृत्त जाणे; अस कोण, कां येथ केलेंचि येणें. ७०