पान:इंदिरा.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०० आर्या. ठेवुनि तंबूमाजी नृपजे, तन्मुख सभीति न्याहाळी, ‘मरते कीं जगते ही!' -भ्रांती पडली तयास त्या काळीं.५९ श्लोक. ह्मणाल्या रवें एक त्या सर्व नारी:- "असे जीव हो इंदिरेच्या शरीरीं !" तदा राजपुत्रे पहा काय केलें, पुन्हा तोंड ना त्या स्थळीं दावियेलें. ६० ह्मणे, "केविं दावूं असें तोंड काळें ? न जाणें, किती कोप ये राजबाळे; असे काळिमा या त्रिवर्गास आली; प्रिया-प्राप्तिची वाट ती बंद झाली !" ६१ न देखीयले मित्र त्यानें कुठेही; निघे शोधण्या त्यां बहू भ्रांत देहीं; अरण्यांतुनी एकटा त्या अवेळे पदीं वाट चालोनि ये पाठशाळे. ६२ चंद्राचा पडला प्रकाश गगनीं तैं पूर्णिमेचा पुरा; वाटे रात्र नव्हे, परी उगवला कीं दीस तो साजरा; कीं आला उद्याप्रती रवि जणूं त्यागोनि उष्णप्रभा; ऐसा त्या रजनीस रंग भरला, आली सुशोभा नभा.६३ मार्गी जातां थोर आले विचार; ग्लानी आली अंतरंगास फार; अंतीं आला पाठशाळेसमोर, उल्लंघोनी कांचनी मुख्य द्वार ६४