पान:इंदिरा.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९९ पाहोनी पडल्या जळीं तरतशा त्या इंदिरेला, सर्वे मारीली उदकीं बुडी नृपसुतें काढावया गौरवें; जी अर्ध्या जगतास रक्षक असे स्त्रीजातिची स्वामिनी, डोहा द्यावि कशी, करोनि उघड्या त्या सारिया कामिनी १५३ नदीमध्यभागीं प्रयत्नें तरोनी, तिचा हात युक्तिप्रयासें धरोनी तिला वामहस्तें जळाच्या तरंगी झणी पोंहवी, भ्यालि जी अंतरंगीं. ५४ जळाचे तरंगांमधीं झाड होतें; धरोनी तयालागिं तो सव्य हातें, नदीच्या तटीं पावला शूर वीर; अशा या ह्मणावें नरा धन्य धीर ! ५५ “गतप्राण झाली महा- सुंदरी ती " ह्मणे आपणा चंद्रकेतू - " न भीती हृदा बाळगीं; रे महत्कार्य झालें, करें या तडी इंदिरेलागि नेलें. ५६ दिंडी. कधीं न कधीं येईल उदयकाल, तदा कामीं मम कृत्य हें पडेल; हृदा ! होऊं रे! नको उतावीळ ! अंतिं भेटे ती, थांब कांहिं वेळ !" ५७ श्लोक. खांदे सांवरिली श्रमोनि बहु तैं त्या राजकन्येप्रती; घेवोनी चढला तटावरुनियां, तो एक तेथें सती दे त्यातें निजहस्तका गलित तत्काये धराया करीं; तंबूची धरि वाट तो नृपसुते वाहोनि खांद्यावरी. ५८