पान:इंदिरा.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९८ दिंडी. कशी आतां भेटेल इंदिरा ती ? दिसे पुनरपि कीं नाहिं ? अशी भ्रांती पडलि त्यातें; न कळेचि कुठे जावें, काय तीच्या प्राप्त्यर्थ तें करावें. ४७ क्रुद्ध झाला मनिं; ह्मणे आपणाशीं:- “थोर, शशिवदना, अससि मौर्यराशी ! कशा जाळाया पिउन मद्य रे तें, असें नाशावें तुवां स्वकार्यातें ? ४८ अरे ऐसा का अंत आजि व्हावा ? घडा गुह्याचा असा कां फुटावा ? भेट पुनरपि हो ! होइ कधीं जेव्हां इंदिरेची; ती हरपलिसे एव्हां !” ४९ श्लोक. मनीं आपणाशीं करी जैं विचार, तथा कार्णे येती तदा शब्द घोर:- “धरा हो धरा, स्वामिणी हो ! बुडाली ! प्रिया मावली नीरडोहांत गेली" ! ५० साकी. धांवत असतां घोडि तियेची नदिधरणा उतरोनी; निसटुनि पडली तिच्यासकट ती, जाती दोन्हि बुडोनी; पडली हाकाटी, । झाली तीरीं बहु दाटी. श्लोक. परिसुनि ध्वनि ऐसा धांवला राजपुत्र, पसरट जिथ होतें थंड तें नीरपात्र; शिरुनि युवति-मेळीं शीघ्र तो तीरिं ठेला; बघितलि पडलेली नीरिं त्या इंदिरेला. ५२