पान:इंदिरा.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९७ ऐशी ही मदिरा सुरासुरनरां जी मानली ना कदा, झाली त्या अबलाकलापिं दमल्या अत्यंत दुःखास्पदा; यासाठीं विषतुल्य हो, जन कदा ही प्राणहंत्री सुग सर्वांशीं कुलनाशका भयकरी सेवूं नका दुर्धरा. आहे औषधि दिव्य सत्य जरि ही वैद्यांचिया हस्तकीं; त्यालागीं सुखदा नितांत गुणि, जो लोळे जराग्रस्त कीं; ऐषारामिं तरी अवश्य नसतां, केल्या हिचें सेवन, मारावी बुडि जाणुनी जळतळीं, तैसें करी जीवन. ४२ धोका तैं हृदयांतरीं बसतसे, वैद्यां नये काढितां; गानें होति हळूहळू शिथिल तीं, उन्माद तो वाढतां; लागोनी थरकांप हस्तपदिं, ते होवोनि जाती कृश, संभारा तनुच्या न साहुं शकती, वैरी असें हें विष ४३ दिंडी. राजपुत्राची अशी तैं निराशा झालि; गेले श्रम व्यर्थ सर्व नाशा ! उभा राहे कमलाक्ष तया संगीं, दुजें नुरलें कुणि तेथ त्या प्रसंगीं. ४४ पळे युवती एकेक कंपितांगी, तसा तिळतिळ तो तुटे अंतरंगीं; पळत अश्वांच्या पाउलास ऐके, तया प्रत्येकीं वसति हदीं ठोके. ४५ श्लोक. लेखें हातवळा, मळा शिंपडितां, गातां सुधारे गळा, तैशीं दोन हृदें समीप असतां काळेहि लागे लळा; ऐशी आस धरोनि राहत सदा जो इंदिरेच्या सर्वे, त्यालागीं विपदा अशी भयकरी, कल्पांति ना सोसवे. ४६ ९