पान:इंदिरा.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्त्रीकर्णाला निषिद्ध ऐशी ठुबरी मुर्खि त्या येतां, चकित जाहल्या सर्व कामिनी, उपजे मानें त्यां चिंता. ऐसा घोर पडे, । क्षणिं त्या गर्दी एक उडे. ३५ दिंडी. दटावी तैं कमलाक्ष त्या खुळ्याला; मुखीं येई म्लानत्व कमलजेला, मधुकरीनेंही अधोवदन केलें, ह्मणे "झांकीलें तेंचि उदयिं आलें!" ३६ " खबर्दार ! " ह्मणे इंदिरा सकोप; चंद्रकेतूच्या हृदयिं होइ लोप मित्रभावाचा, तदनु तैं शशीतें उरीं हाणियली मुष्टि रुष्ट घातें. ३७ श्लोक. “खबर्दार मूर्खा ! " ह्मणे राजपुत्र; उरीं लागतां मुष्टि, तत्प्राणमित्र भयाभीत होऊन राहे उभा तो; पडे हांक मोठी, नभीं नाद जातो. ३८ मधुकरि तयि कंपें दीर्घ आरोळि फोडी; दचकुनि उठली ती इंदिरा तैं तडाडी; वदलि; - "त्वरित आणा घोडि ! जाऊं घराला कहर हर ! इथे हा घोर कां आजि आला ! १३९ सकल युवतिंमाजी एक कल्लोळ झाला; पळत सुटति साज्या; कोणि नाहीं कुणाला पुसतचि, परि धांवे, सांपडे जेथ वाट; विरस परम झाला; मोडला सर्व थाट ! ४०