पान:इंदिरा.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्चस्वा मिळवावया पुरुष हे स्त्रीदास्यही भोगिती ! आली हातिं तयां लगाम. मग ते कांहींच ना मानिती; स्त्री आहे अति नीच, आपण धणी, भावे तसें वागती; ऐशी दुःखद् सत्य ही जागं सदा आहे स्त्रियांची गती. २९ करीं खाटिकाच्या पडोनी मरावें, परी या नरांच्या न हातींच यावें; विधीनें असा काय संकेत केला, नरांच्या करीं सर्व व्यापार गेला ! ३० असे गाइला व्यर्थ शृंगार सारा, न ये या स्थळीं आमुच्या तो विचारा; वृथा मानुं तो सर्व प्रेमा नरांचा, प्रसंगानुसारी वृथा त्यांचि वाचा. ३१ तुह्मां गांवच्या नारिंची रीतभात अहो वर्णिलेली असे पूर्ण ज्यांत, असें कांहिं आह्मांस गावोनि दावा. बहू इच्छितों काळ मौजेंत जावा. " ३२ अशा आर्जवें इंदिरा ती सुनेत्रा, तदा प्रेक्षुनी बोलली राजपुत्रा; तसें गीत गावें तदा मानसाचा असे हेतु त्याचा, स्फुरे तेविं वाचा. ३३ " साक्या. इतुक्यामाजी शशिवदनाच्या माद शिरीं मद्याचा शिरला, नुरलें देहभान त्या तान सुटे गाण्याचा. गाण्या लागे तो, । तेणें आगी पेटवितो. ३४