पान:इंदिरा.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४ श्लोक. त्यजुनि कोकिले ! रम्य या वना गमन गे करीं दक्षिणी जना, उठविं तूं तिच्या प्रेम मानसीं; वद तिच्याचि मी जाई भेटिसीं. १२३ परिसुनि अशिया त्या राजपुत्राऽऽननींचें नररव भरलेलें गायन, प्रेम साचें, सकल युवति पाहों लागती एकमेकां, गद गद गदनादें हांसती सर्व त्या कां. २४ जरी गायनाचें कळेनाचि मर्म, तरी हांसतां एक, दूजी स्वधर्म असे हांसण्याचा असें मानुनीयां, हंसें येइना तोंहि लागे हंसाया ! २५ वदे इंदिरा:- "मंडुकाचे परी हा ध्वनी ऐकुनीयां सुटे कंप देहा; असे काय हा कंठ, ऐसा स्त्रियांचा ! नसे अर्थ शब्दांत, ना गोड वाचा. २६ असे गाइला सर्व शृंगार बाई, नसे अर्थ, वा त्यांत कांहीं नवाई; जुनी गोष्ट सारी, स्त्रियांना वरावें- रुचे तोंवरी त्यांप्रती लुब्ध व्हावें ! २७ पुढें एक सोडोनि दूजी धरावी, कृती निंद्य ऐशी किती ही करावी; नसे कांहिं लज्जा, न कांहींच भीती, न मानीति शास्ता; अशा घोर रीती. २८