पान:इंदिरा.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९३ पद. ( त्याच चालीवर. ) तुजसवें उडुनि येतों, जरि असते पंख ते; बसुनियां दारिं तीच्या, दाखवितों प्रेम तें; तिशिं करुनी गोड गोष्टी, तिज प्रेमें जिंकितों; घालुनियां मोह तितें, तिचि करुणा भाकितों ! १९ पद. ( त्याच चालीवर. ) तुजसम मी कोकिले गे ! पक्षि न कां जाहलों ! कुणि काळीं स्कंधिं तीच्या तरि असतों बैसलों । स्थळ मिळतां एकदा तें कधिं नचि तें सोडितों ! आनंदें जन्म सारा तेथें मी पहुडतों ! २० पद. रागिणी भैरवी- -ताल त्रिवट. हृदयीं तिच्या कां प्रेम न जागे? तरुणी अशि कां निष्ठुर वागे ? ॥ ध्रु० ॥ कोकिले ! तिजला सांगें, फिरें मी शुद्ध्यर्थ तिचिया दक्षिणग्रामीं; ॥ १ ॥ उत्तरग्रामा सोडून आलों, कीर्तीस तिचिया लुब्ध मी झालों ॥२॥ २१. पद. ( याच चालीवर. ) क्षणिक असे हें मानव-आयु, परि प्रेमभाव राहे चिरायु० ॥ ध्रु० ॥ उत्तरदेशीं कामिनी-यौवन बहुदिन राहूनि हर्षवी स्त्रीजन; १ दक्षिणदेशीं अल्पवयीं तें सौंदर्य यौवना सोडूनि जातें. २ २२