पान:इंदिरा.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ पद राग बिहाग ताल त्रिवट. “रामा नवल बघ हैं" - या चालीवर. (अण्णा मार्तडकृत उत्तररामचरितांतील). पुरुषांला विषप्राय झालें मी, । आयका स्त्रियांनो. ॥ ध्रु ॥ उपाय योजा जेणें आपुला । मानस सिद्धिस पूर्ण जाय, ध्यास लागला स्त्री-उन्नतिचा । लहुं या बघतां काय? ॥१॥ पुरुषांला० ॥ हा महिलांचा समाज पहिला । सकल महीला सौख्याधार होऊं द्या; ही नरबळजोरी | स्त्री-मुखि वदवी हाय."|| २ || पुरुषांला ● श्लोक. वदे इंदिरा राजपुत्रा तदा ती:- “ह्मणा गीत कांहीं, तुझां गांविं गाती; प्रशंसा नको हो भल्या ती नरांची, नको त्यांत गाहाणि गेल्या दिसांचीं. १६. परी गा कसे दीस येती स्त्रियांना, स्थिती योग्य होई कशी प्राप्त त्यांना.” तदा गीत तेणें स्वयें कल्पिलेलें, मुखें मंजु घोषें तिथें गाइयेलेंः-१७. पद. जिल्हा झिंजोटी- ताल त्रिवट. चंद्रकेतु रविवंशीं- या चालीवर. दक्षिणेशि उडुनि जाई झडकरि अगे कोकिले ! प्रियसखिच्या बसुनि दारीं, वद तुज जें कथियलें ! 'निर्दय कीं दक्षिणेचे जन, तैसे चंचळ; नसति तसे उत्तरेचे; हृदयीं ते कोमळ. १८