पान:इंदिरा.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तैसा झाला हा गतकाळ, ह्मणुनी जग हें झालें विव्हळ; पुनर्जीवनी श्रम निष्फळ जातिल ते सारे. १० पद ( पंजाबी ठुबरी) जिल्हा झिंझोटी ताल त्रिवट. (“ गाहो जगपति ” — या चालीवर. ) मृतसखयेचें स्पष्ट जसें तें, चुंबन स्मरणीं अक्षय राहतें; अथवा प्रेमळ निजपत्नीचा, प्रेमा हृदयीं जागत साचा; तैसा हा गतकाळ हृदांतरीं जागत राही पडतां हारीं”. ११ दिंडी. गीत गातां तन्नयनिं अश्रु आले, लाल गालांवरि अश्रु-लोट चाले; वाणि प्रेमळ मंजूळ तिनें ऐशी, काढली कीं ती गेलि हृत्तळाशीं. १२ श्लोक. गीतें ना रुचलीं विरोध भरलीं ऐशीं परी इंदिरे; ऐकोनी निजकर्मवर्म कथिलें, क्रोधें मनीं ती स्फुरे; धिक्कारोनि वदे:- "जरी गतदिनां गावोनियां गे अशा वाणीतें इथ काढिशी सुसमयीं, का त्वन्मनाची दशा ! १३ गेले जे दिन जाउं दे, मनन तें त्यांचें कशा पाहिजे ? येणारे दिन ते बरे उजडती- चिंता अशी वाहिजे; गेला काळ नरांचिया धमकिचा, आतां करूं राज्य या; त्यांशीं तुंबळ योजिला समर हा, पावूं सुकाळीं जया. १४