पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भेटणं शक्य नव्हतं. काही संस्था व पयोध्नी मित्रा यांच्याकडून तिच्याशी संपर्क होऊ शकतो का? हा प्रयत्न मी केला. पण त्याला यश आलं नाही. म्हणून मी तिची कथा वर्तमानपत्रातील लेख, पयोष्नीचं 'Y कान्ट आय रन?' या शांतीवर काढलेल्या डॉक्युमेंटरीच्या आधारावर लिहिली आहे.

- बिंदुमाधव खिरे


 शांती सौंदराजन तामीळनाडूतल्या एका छोट्याशा गावी एका गरीब,दलित कुटुंबात लहानाची मोठी झाली. वडील मजुरी करायचे.
 शांतीला लहानपणापासून खेळाची खूप आवड. तिला आजोबां प्रोत्साहन मिळालं.पुरेसा पौष्टिक आहार नसतानासुद्धा तिने दौडीत उत्कृष्ट कामगिरी केली व ११वी-१२वीत ती तामीळनाडू राज्यासाठी खेळू लागली. २००२ मध्ये तिला राष्ट्रीय स्पर्धेतील दौडीत सुवर्णपदक मिळालं. २००५ मध्ये तिला आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप्स स्पर्धेत ८०० मीटर दौडीत चांदीचं पदक मिळालं.
 २००६ मध्ये तिने दोहा (कतार)येथे आशियाई स्पर्धेत भाग घेतला.तिथे तिला दौडीत चांदीचं पदक मिळालं. त्यानंतर तिची 'जेन्डर टेस्ट' करण्यात आली. त्याचा निकाल तिला कोणी सांगितला नाही. नंतर तिला बातम्यांमध्ये कळालं, की ती 'जेन्डर टेस्ट' अनुत्तीर्ण झाली. सांगण्यात आलं, की तिला वैद्यकीयदृष्ट्या स्त्री मानता येत नाही. याचा तिला व तिच्या घरच्यांना मोठा धक्का बसला; त्यांना खूप दुःख झालं. दोहामध्ये झालेल्या स्पर्धेत मिळालेलं चांदीचं पदक तिच्याकडून काढून घेतलं गेलं. तिला खेळाचं क्षेत्र सोडून जाण्यास सांगितलं गेलं.

 काही प्रसारमाध्यमांनी सांगितलं, की शांतीला 'अँड्रोजेन इन्सेन्सिटिव्हिटी सिंड्रोम' आहे, म्हणजे लिंग गुणसूत्रानुसार ती मुलगा आहे. (तिच्यात अँड्रोजन संप्रेरकं तयार होत असली तरी या संप्रेरकांचा वापर तिच्या

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ९५