पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जवळच्या नातेवाइकांना माहीत आहे तेवढंच. माझ्या वेगळेपणाबद्दल इतरांना सांगावं अशी जवळची माणसं फार कमी आहेत. दुसरं असं वाटतं, की आपल्या वेगळेपणाची माहिती इतरांना का देत बसावं? आपण जे आहोत ते आहोत. कोणाला त्याच्याशी काय देणं घेणं आहे?
 मला फारशा मित्र-मैत्रिणी नाहीत. काही मैत्रिणींना माहिती असेल की मला मासिक पाळी येत नाही. मात्र जेव्हा मी त्यांच्याबरोबर असते तेव्हा त्या मला वेगळी वागणूक देत नाहीत. मी त्यांच्यातील आहे असं मला आणि त्यांना वाटतं. त्या माझ्याशी कोणताही भेदभाव करत नाहीत.
 मी कॉलेजमध्ये असताना मला एक मैत्रीण भेटली. तीही माझ्या कॉलेजमधील होती. तिला माझ्यात रस वाटला व तिने मला सेक्ससाठी विचारलं. माझा पहिला सेक्स तिच्याबरोबर झाला. पहिल्या सेक्सच्या वेळी मला खूप उत्सुकता होती आणि बरंही वाटत होतं, की कुणीतरी आपला स्वीकार करतंय. पण त्याचबरोबर आपल्या स्त्री जोडीदाराला आपलं अंग कसं दाखवायचं? तिला घाण किंवा विचित्र वाटणार नाही ना? असे अनेक प्रश्न मनात आले.
 आम्ही जेव्हा एकत्र होतो तेव्हा आम्ही कधी दिवसा तर कधी रात्री सेक्स करायचो- ओरल सेक्स, बॉडी सेक्स. संभोगाच्या वेळी मी पुरुषाची भूमिका बजावायची. पण मी खरा पुरुष नसल्यामुळे मला सेक्सचा पुरेपूर आनंद उपभोगता येत नाही.
 एकदा तिनं मला माझ्या वेगळेपणाविषयी विचारलं; पण मला त्या विषयावर चर्चा नको होती, म्हणून मी तिला, 'मला माहीत नाही' असं सांगून उडवून लावलं. त्यानंतर तिनं कधीच काही विचारलं नाही.

 माझं तिच्याबरोबरचं नातं एकच वर्ष टिकलं. ती खूप चांगली होती. मला ती फार आवडायची; पण सुरुवातीपासूनच जाणीव होती, की आमच्या दिशा वेगळ्या आहेत. म्हणून मला तिच्याबद्दल प्रेम वाटत असलं तरी मी

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ८८