पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोणतेच अश्लील चाळे करत नव्हतो." त्यावर तो म्हणाला, "तुम्ही असं देवळात बसू नका" आणि निघून गेला.
 माझ्या जोडीदाराचा व माझा पहिला सेक्स झाला त्यावेळी मी आणि ती खूप गोंधळलेल्या अवस्थेत होतो. नेमकं काय करायचं हे कळतच नव्हतं. पण सेक्स पेक्षाही माझ्या पार्टनरनं मला स्वीकारलं होतं, यातच मला धन्यता वाटत होती. त्यावेळी मी २२-२३ वर्षांची होते.
 मला तिच्याबरोबर लैंगिक सुख उपभोगायला खूप आवडतं. मला तिचं सुख महत्त्वाचं वाटतं. तिला तृप्त करणं मला खूप आवडतं. सेक्सच्या वेळी मला पुरुषाची भूमिका घ्यायला आवडते, पण जेव्हा मी तिच्याबरोबर सेक्स करते तेव्हा मला असं वाटतं, की जर का माझी शिस्निका अजून मोठी असती तर मला ती पुरुषाच्या लिंगासारखी संभोगासाठी वापरता आलीअसती. एरवी मला माझी मोठी शिस्निका आवडत नाही.
 ती माझ्याबाबतीत 'पझेसिव्ह' आहे. तिला मी इतर मैत्रिणींशी जवळीक केलेली अजिबात आवडत नाही. तिला सतत असं वाटतं, की मी कुणा दुसरीच्या प्रेमात पडून तिला सोडून देईन.
 माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. मला तिच्याबरोबर एक खास नातं हवं आहे. मी सतत आमचं नातं जमून राहावं यासाठी प्रयत्न करत असते; तसंच आमच्यात सेक्स कसा चांगला होईल या बाबींचाही मी विचार करत असते. मला सांगण्यास आनंद वाटतो, की आम्ही ४ वर्षांपासून एकत्र आहोत.

 जर मला तुम्ही विचारलंत, की तू पूर्णपणे स्वत:चा स्वीकार केला आहेस का? तर मी म्हणेन - हो आणि नाही. कधी कधी असं वाटतं, की मी जर इतर मुलींसारखी असते तर बरंच सुखी जीवन जगले असते. पण दुसऱ्याच क्षणी असंही वाटतं, की जीवन खूप छोटं आहे व रडणं व्यर्थ आहे. मी खूप जास्त विचार करत बसले तर त्रास होतो. मला आध्यात्मिक वाचनाचा फायदा होतो. शांत वाटतं,

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ८५