पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

2. External genitalia is ambiguous with both gonads seen descended.
Diagnosis - Disorder of Sexual Differentiation.
Partial Androgen Insensitivity Syndrome.
Male Pseudohermaphrodism.
याचा अर्थ असा, की जॅक्युलीन इंटरसेक्स होती.
 या कालावधीत तिचं प्रशिक्षण होऊ शकलं नाही. तिला कारणे दाखवा नोटिस पाठवण्यात आली. तिने तिचं वेगळेपण लपवून स्त्रियांच्या कोट्यात नोकरी मिळवायचा प्रयत्न केला व ती परीक्षेस बसली नाही, कारणास्तव तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं.
केस : जॅक्युलीन मेरीने मद्रास हायकोर्टात धाव घेतली. कोर्टासमोर दोन महत्त्वाचे प्रश्न होते.
१. जॅक्युलीन स्त्री आहे का? व ती स्त्रियांसाठी राखीव पदासाठी (स्त्री पोलीस कॉन्स्टेबल) पात्र आहे का?
२. तिच्या वेगळेपणाचं कारण दाखवून तिला नोकरीवरून काढून टाकलं जाऊ शकतं का?
 कोर्टाने या प्रश्नाचं उत्तर शोधताना NALSA VIs युनियन ऑफ इंडिया केसचा आधार घेतला व १७-०४-२०१४ला निकाल दिला, की जरी NALSA केसचा निकाल ट्रान्सजेंडर/तृतीयपंथीयांना लागू असला तरी त्या निकालाचा युक्तिवाद या केसमध्येही लागू होतो. प्रत्येकाला आपल्या लिंगभावानुसार अधिकार मिळाले पाहिजेत. ते मिळाले नाहीत तर ते संविधानातील कलम १४, १५, १६, १९ व २१चं उल्लंघन आहे. कोर्टानी सांगितलं, की-

- जॅक्युलीनचा लिंगभाव स्त्रीचा आहे म्हणून, तिच्या जननेंद्रियांत वेगळेपण असलं तरी तिला स्त्री म्हणून जगण्याचा पूर्ण अधिकार आहे.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ७५