पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करतं. संमतीने व खासगीत संभोग करणाऱ्या प्रौढांना हे कलम लावू नये. [4]
 काही सनातनी/धार्मिक व्यक्ती/संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात या निकालाविरुद्ध अपील केलं व ११ डिसेंबर २०१३ला सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली हाय कोर्टाचा निकाल रद्दबातल ठरवला. [5] मे २०१५च्या अखेरीस या केसची 'क्युरेटिव्ह पेटिशन' सर्वोच्च न्यायालयात पडून आहे.
• जॅक्युलीन मेरी V/s स्टेट ऑफ मद्रास [6]
 NALSA V/s युनियन ऑफ इंडियाच्या निकालानंतर लवकरच इंटरसेक्सचा विषय समोर आला तो जॅक्युलीन मेरी VIs स्टेट ऑफ मद्रासच्या केसमध्ये.
पार्श्वभूमी : जॅक्युलीन मेरीचा जन्म २६-०८-१९८९ला झाला. बाळाची नोंद मुलगी म्हणून करण्यात आली. तिला मुलीचं नाव देण्यात आलं. ती मुलींच्या शाळेत गेली. तिचं चालणं बोलणं मुलींसारखं होतं. तारुण्यात तिने मुलींच्या गटात विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला व अनेक बक्षिसं मिळवली. २०१०मध्ये तिला बॅचलर ऑफ सायन्स (फिजिकल एज्युकेशन) पदवी मिळाली.
 २०११मध्ये 'तामीळनाडू युनिफॉर्म सर्व्हिस रेक्रुटमेंट बोर्ड चेन्नई' मार्फत तिची ग्रेड II पोलीस कॉन्स्टेबल (स्त्री) साठी निवड झाली. पोलीस रेक्रुट, वेल्लोरला तिचं प्रशिक्षण सुरू झालं. या दरम्यान सर्व प्रशिक्षणार्थीची मेडिकल चाचणी करण्यात आली. जॅक्युलीनला अधिक चाचण्यांसाठी 'राजीव गांधी मेमोरिअल गव्हर्नमेंट जनरल हॉस्पिटल, चेन्नई'ला पाठवण्यात आलं. तिच्या गुणसूत्रांची व संप्रेरकांची चाचणी करण्यात आली. ०२-०७- २०११ला या चाचण्यांचा निकाल आला व त्यात निष्कर्ष होता, की-

1. This person's chromosomal study showed male pattern 46 XY

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ७४