पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

• NALSA (नॅशनल लीगल सर्व्हिसेस अॅथॉरिटी) VIs युनियन ऑफ इंडिया. [1]
पार्श्वभूमी : शरीराने पुरुष असलेले पण ज्यांचा लिंगभाव स्त्रीचा आहे ("M to F' ट्रान्सजेंडर) अशा व्यक्तींना कायदा पुरुष मानायचा. याचा अर्थ ज्या व्यक्ती स्वतःला उघडपणे ट्रान्सजेंडर/तृतीयपंथी म्हणून मानत होत्या, अशांना कायदा पुरुष मानत होता. म्हणजे एकीकडे समाज 'हे पुरुष नाहीत' म्हणून त्यांची हेटाळणी करत होता; पण कायदा मात्र हे पुरुष आहेत व त्यांना पुरुषाचे कायदे लावले पाहिजेत हे सांगत होता. याचं एक उदाहरण- कमला जान ही तृतीयपंथी, कटणी शहरात (मध्य प्रदेश) महापौरपदाच्या निवडणुकीसाठी उभी राहिली. ती निवडून आली, पण ती जागा स्त्रियांसाठी राखीव असल्यामुळे २००२मध्ये कोर्टाने तिची निवडणूक अवैध ठरवली. [2] ती स्वतःला स्त्री का पुरुष मानते, म्हणजे तिचा लिंगभाव कोणता आहे, याला कायद्यात काही किंमत नव्हती.
 समाज "M to F' ट्रान्सजेंडर/ तृतीयपंथीयांना समतेची वागणूक देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तृतीयपंथी हे समाजाचा भाग आहेत व त्यांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत ही समाजाची मानसिकता नाही.
केस : तृतीयपंथीयांच्या अधिकारांसंदर्भात, २०१२मध्ये NALSAनी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका (PIL) दाखल केली. १५ एप्रिल २०१४ला जस्टिस के. एस. राधाकृष्णन व जस्टिस ए. के. सिकरी यांनी ऐतिहासिक निर्णय दिला, की प्रत्येक व्यक्तीला आपल्या लिंगभावानुसार स्वतःचं लिंग ठरवण्याचा अधिकार आहे, पुरुष किंवा स्त्री किंवा 'थर्ड-जेंडर'.
या निकालात माननीय न्यायाधीशांनी सांगितलं की-

- लिंगभावाला कायद्याची मान्यता नसणं हे संविधानातील कलम १४,

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ७२