पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर या लैंगिक अल्पसंख्याक समाजाच्या चळवळीने इंटरसेक्स समाजाला सामावून घेतलं आहे. असं असलं तरी समाजासमोर आपले प्रश्न मांडणाऱ्या इंटरसेक्स व्यक्तींची नीतांत आवश्यकता आहे. माणूस म्हणून त्यांचा चेहरा समाजासमोर आला पाहिजे. इतरांनी इंटरसेक्स व्यक्तींच्या अधिकारांवर बोलणं आणि स्वतः इंटरसेक्स व्यक्तीने स्वत:च्या अधिकारांबद्दल बोलणं यात फरक आहे. इंटरसेक्स व्यक्ती समाजाला अजिबातच दिसत नाहीत आणि म्हणून लोकांमध्ये या विषयाबद्दल अज्ञान आहे, असहिष्णता आहे.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ७०