पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्रीबीजांड नसल्यामुळे उर्वशीला इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉनची इंजेक्शन्स दिली गेली. याचमुळे तिच्या गर्भाशयाची वाढ झाली. गर्भाशयाच्या आतल्या बाजूस विशिष्ट पेशींचं अस्तर तयार होऊ लागलं. मासिक पाळी सुरू झाली.
 याच्यानंतर, दुसऱ्या एका स्त्रीच्या स्त्रीबीजांडातून एक परिपक्व स्त्रीबीज काढण्यात आलं व उर्वशीच्या नवऱ्याचं पुरुषबीज या स्त्रीबीजात 'इन्ट्रासायटोप्लासमिक स्पर्म इन्जेक्शन' (ICSI) द्वारे घालण्यात आलं. हे फलित बीज उर्वशीच्या गर्भाशयात रुजवण्यात आलं. तिच्या शरीरात इस्ट्रोजेन व प्रोजेस्ट्रेरॉन तयार होत नसल्यामुळे, प्रसूतीपर्यंत तिला इस्ट्रोजेन व इतर औषधं घ्यावी लागली. पहिल्यांदा हा प्रयत्न अयशस्वी झाला. परत एकदा प्रयत्न केला गेला.
 दुसऱ्या प्रयत्नाला यश आलं. गर्भाची नऊ महिने वाढ झाल्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करून एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुलं तिला झाली. (दोन मुलं होण्याचं कारण ही प्रक्रिया अवघड आहे, स्त्रीला त्रासदायक आहे व यश येण्याचं प्रमाण कमी आहे. ही प्रक्रिया खर्चिकही आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून, गर्भाशयात एकच फलित बीज न रुजवता, दोन किंवा तीन फलित बीजं रुजवली जातात. त्यातील एकतरी फलित बीज वाढेल ही आशा असते. उर्वशीच्या बाबतीत एकाच वेळी दोन गर्भ वाढले). या सर्व प्रयत्नात तिने धीर धरला व तिच्या नवऱ्याने साथ दिली, म्हणून या प्रयत्नांना यश आलं.
सामाजिक संस्था

 इंटरसेक्स व्यक्ती पुढे येऊन आपल्या समस्या मांडत नसल्यामुळे, जशी गे, ट्रान्सजेंडर समाजाची चळवळ उभी राहिली तशी इंटरसेक्स व्यक्तींच्या अधिकारांची चळवळ भारतात आजवर उभी राहिली नाही. भारतात इंटरसेक्स व्यक्तींनी उभ्या केलेल्या संस्था नाहीत. असं असलं तरी आशेचा किरण आहे. इंटरसेक्स व्यक्ती लैंगिक अल्पसंख्याक असल्यामुळे

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ६९