पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माहिती व पर्याय द्या. लैंगिकता, लैंगिक अनुभव या विषयांवर मोकळेपणाने त्याच्याशी/तिच्याशी संवाद साधा.
• बहुतेक जननेंद्रियांच्या वेगळेपणासाठी शस्त्रक्रिया केलीच पाहिजे अशी परिस्थिती नसते.
• जर प्रौढपणी त्या व्यक्तीने SAS करायची ठरवली तर शस्त्रक्रियेअगोदर त्याला/तिला दुसऱ्या लिंगाची (घडवल्या जाणाऱ्या लिंगाची) जीवनपद्धती काही काळ जगण्यास सांगा. अशानी त्या व्यक्तीला ती, ही नवी जीवनपद्धती स्वीकारू शकते का नाही? हे उमजेल व मग त्या अनुषंगाने ती व्यक्ती त्या दिशेने पाऊल टाकायचं का? हे ठरवेल.
• पालकाने/इंटरसेक्स व्यक्तीने व डॉक्टरांनी केसचे संपूर्ण डॉक्युमेंट्स/रिपोर्ट्स/केसपेपर्स नीट जपून ठेवावेत.
• लक्षात ठेवावं, की डॉक्टर्स या विषयाचे जाणकार असले तरी उपचारांच्या बाबतीत (अत्यावश्यक व तातडीची शस्त्रक्रिया वगळता) - औषधोपचार/ शस्त्रक्रिया करायची का? कोणती करायची? कधी करायची? याचा अधिकार त्या व्यक्तीला आहे. डॉक्टरांनाही नाही आणि पालकांनाही नाही. ती व्यक्ती सज्ञान झाल्यावर तिला या विषयावर विचार करू द्या, अभ्यास करू द्या व त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार कृती करा. औषधोपचार/शस्त्रक्रियेसाठी त्या व्यक्तीवर कोणतीही सक्ती करू नका, दबाव आणू नका. शक्यता आहे, की ती व्यक्ती कोणतीही शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेईल. अशा निर्णयात काहीही गैर नाही, चुकीचं नाही.
जीवनपद्धती

 इंटरसेक्स व्यक्तींना समाजात वावरताना सर्वांत मोठी अडचण येते ती म्हणजे समाज फक्त दोनच लिंगात विभागलेला आहे- पुरुष व स्त्री. पुरुष/स्त्रीच्या वैद्यकीय व्याख्येत एखादी व्यक्ती बसत नसेल, तर समाजात

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ६५