पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाळाला इंटरसेक्स म्हणून वाढवलं जाऊ नये कारण हे नाव अजून तरी समाजात प्रचलित नाही. या काळात बाळाला त्याच्या आवडीनिवडी ठरवण्याचं स्वातंत्र्य द्या. उदा., खेळणी निवडणं, मित्र-मैत्रिणी निवडणं इत्यादी. बाळाला सक्तीनं किंवा दडपणाखाली मुलगा म्हणून वाग किंवा मुलगी म्हणून वाग असा हट्ट करू नका (अशाने त्या मुलाचा लिंगभाव घडत नाही).
• काही बाळांच्या बाबतीत ते बाळ मुलगा आहे का मुलगी आहे हा अंदाज लावणं अवघड असतं व लावलेला अंदाज चुकू शकतो.
• मुला/मुलीला समजू लागल्यापासून त्याला कळेल अशा सोप्या शब्दात ही माहिती सांगू लागा.
• या मुला/मुलीला आधार द्या. क्रूर, दुष्ट मित्र/मैत्रिणींपासून त्याचं संरक्षण करा.
• कुटुंबातील व्यक्तींचं व या मुला/मुलीचं योग्य त्या टप्प्यात काउन्सेलिंग करा. उदा., ते मूल शाळेत जायच्यावेळी; तारुण्यात प्रवेश करताना इत्यादी. काउन्सेलिंग तीन वेगवेगळ्या गटात केलं जावं. फक्त पालकांचं काउन्सेलिंग, फक्त मुला/मुलीचं काउन्सेलिंग, एकत्रितपणे पालक व मुला/मुलीचं काउन्सेलिंग.
• जर या विषयावर काम करणाऱ्या काही सामाजिक संस्था असतील तर पालकांना व मुला/मुलीला अशा संस्थांची माहिती द्या.
• जननेंद्रियांची तपासणी कमीत कमी वेळा करावी. ती करण्याअगोदर त्या मुला/मुलीची संमती विचारावी. त्या मुला/मुलीला संदेश मिळाला पाहिजे, की त्याच्या/तिच्या जननेंद्रियांवर त्याचाच/तिचाच अधिकार आहे. ना पालकांचाना डॉक्टरांचा.
• जेवढं शक्य आहे तेवढं, या मुला/मुलीला इतर मुला/मुलींसारखं वाढवा.

• मुलगा/मुलगी प्रौढ झाल्यावर औषधोपचार, शस्त्रक्रिया इत्यादी सर्व

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ६४