पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठेवण्यात आलं व मग जॉन मनी यांनी घोषित केलं, की ती स्वत:ला मुलगी मानू लागली आहे. या केसवरून (१९७०-१९८० च्या दशकामध्ये) अनेक डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला, की लहान मुलांना ज्या लिंगभावाचं म्हणून वाढवाल त्या लिंगभावाची त्या मुलाची मानसिकता बनते.
 सगळेच डॉक्टर या तर्काशी सहमत होते असं नाही. त्यांचं म्हणणं होतं, की लैंगिकतेचे काही पैलू आजूबाजूच्या वातावरणातून घडत नाहीत, ते गर्भावस्थेतच घडतात. याला 'प्रिनेटल ऑर्गनायझेशन अॅन्ड सबसिक्वेंट ऑक्टिव्हेशन थिअरी' म्हणतात. या तर्काकडे कोणी फारसं लक्ष दिलं नाही.
 जसजशी 'जोन' वाढत गेली तसतसं मात्र लक्षात यायला लागलं, की ती दिलेली मुलीची भूमिका मान्य करायला तयार नव्हती. तिला फ्रॉक घातलेला आवडायचा नाही. तिला 'सैनिक-सैनिक' खेळायला आवडायचं. ती उभं राहूनच लघवी करण्याचा प्रयत्न करायची.
 हे सर्व होत असताना, पालक आणि डॉक्टरांनी, 'जोन' जन्माने मुलगा आहे हे ‘जोन' पासून लपवलं होतं. वयाच्या १४व्या वर्षी 'जोन'ने धमकी दिली, की त्याला पुरुषासारखं राहू दिलं नाही तर तो आत्महत्या करेल. मग नाइलाजानं त्याला सत्य सांगितलं गेलं.
 दुसरीकडे 'M to F' ट्रान्सजेंडर व्यक्ती (मराठी भाषेत आपण तृतीयपंथी शब्द वापरतो- जे पुरुष स्वत:ला स्त्री मानतात व स्त्रीची जीवनपद्धती जगतात) समाजाच्या रोषाला, विरोधाला न जुमानता स्त्री म्हणून जगण्याची धडपड करत होते. समलिंगी पुरुष, समाजाचा व कायद्याचा विरोध असतानाही समलिंगी नाती प्रस्थापित करायची धडपड करत होते. काही इंटरसेक्स व्यक्ती ज्यांना एका विशिष्ट लिंगाचं मानून वाढवलं गेलं होतं, त्या मोठ्या झाल्यावर, आपल्याला निसर्गाने दिलेला लिंगभाव वेगळा आहे, हे उमजू लागल्यावर आपल्या नैसर्गिक लिंगभावानुसार जगू लागल्या.

 डॉक्टरांच्या 'सायकोसेक्शुअल न्यूट्रॅलिटी' तर्कावरचा लोकांचा विश्वास कमी होऊ लागला आणि 'प्रिनेटल ऑर्गनायझेशन अॅन्ड सबसिक्वेंट

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ५५