पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इंटरसेक्स असतं. [6]
 प्रोफेसर ॲलिस डोमुराट ड्रेजर म्हणतात, की अंदाजे १५०० नवजात बालकांमध्ये १ नवजात बालक इंटरसेक्स असतं. [7] इंटरसेक्स सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका (ISNA)ने अशीच आकडेवारी दिली आहे, की अंदाजे १५०० ते २००० नवजात बालकांमध्ये १ नवजात बालक इंटरसेक्स असतं.
 या विविध आकडेवारीवरून आपल्याला म्हणता येईल, की अंदाजे २००० ते ५००० नवजात बालकांमध्ये १ नवजात बालक इंटरसेक्स असतं.
 जननेंद्रियांतील काही वेगळेपणाची अंदाजे आकडेवारी खाली दिली आहे. [6] ही आकडेवारी पाश्चात्त्य देशांतील आहे. भारतात अशी माहिती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नाही.
आकडेवारी [5]
• अंदाजे १००० मुलांमध्ये एकात क्लिनफेल्टर सिंड्रोम आढळून येतो.
• अंदाजे ३००० मुलींमध्ये एकीत टर्नर सिंड्रोम आढळून येतो.
• अंदाजे १५,००० मुला/मुलींमध्ये एकात 'क्लासिकल' CAH आढळून येतो.
• अंदाजे १५,००० मुलांमध्ये एकात कंप्लिट AIS आढळून येतो.

• अंदाजे १,००,००० मुलांमध्ये एकात टूहरमॅफ्रोडाइट आढळून येतो.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ५३