पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

• पुढील परिस्थितीत बाळाला मुलगी म्हणून वाढवावं-
• लिंग गुणसूत्र XY+AIS (Grades 4 to7)
• लिंग गुणसूत्र XX+CAH + मोठी शिस्निका (Clitoromegaly)
• लिंग गुणसूत्र XX + गोनाडल डिसजेनेसिस
• लिंग गुणसूत्र XY+ गोनाडल डिसजेनेसिस
• टर्नर सिंड्रोम असलेल्या व्यक्ती
• मिक्स गोनाडल डिसजेनेसिस (MGD) असेल तर लिंगाची लांबी किती आहे व भगोष्ट/वृषणकोश किती जुळलेले आहेत याचा अभ्यास करून लिंग ठरवावं. टेस्टोस्टेरॉनच्या पातळीवरूनही हे बाळ मुलगा आहे का मुलगी, याचा अंदाज घेता येतो.
• टू हरमॅफ्रोडाइट असेल तर लिंगाची लांबी किती आहे व भगोष्ट/वृषणकोश किती जुळलेले आहेत याचा अभ्यास करून लिंग ठरवावं.
 लक्षात ठेवा, की वरील प्रकरणांसाठी ही मार्गदर्शक तत्त्व असली तरी काही बाळांच्या बाबतीत अंदाज लावणं अवघड असतं.
आकडेवारी
 इंटरसेक्स व्यक्ती समाजात किती प्रमाणात आढळतात? या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही.
 एकतर कोणाला इंटरसेक्स म्हणायचं हे ठरवणं अवघड असतं, कारण प्रत्येक व्यक्ती ज्याच्या/जिच्या जननेंद्रियांत वेगळेपण आहे, ती व्यक्ती इंटरसेक्स असतेच असं अजिबात नाही.
 दुसरी अडचण अशी, की अशा विषयाबद्दल सर्वेक्षण करायचं झालं तर किती जण त्यांच्या या वेगळेपणाबद्दल माहिती द्यायला तयार होतील? ज्या समाजात या विषयाबद्दल कमालीचं अज्ञान आहे, लाज आहे अशा ठिकाणी सर्वेक्षणातून अचूक आकडेवारी कशी मिळणार?

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ५१