पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सोनोग्राफी : बाळाची आंतरिक जननेंद्रिय, त्यांची रचना समजून घेण्यासाठी सोनोग्राफी केली जाते.
एक्स-रे : काही विशिष्ट परिस्थितीत एक्स-रे काढले जातात. पाठीचा मणका, कंबरेच्या हाडाची (खुबा) रचना इत्यादी समजून घेण्यासाठी एक्स-रे काढले जातात.
 या तपासण्या केल्यावर त्यांचा सर्वांगीण अभ्यास करून निदान केलं जातं. या सर्व चाचण्यांव्यतिरिक्त, शरीरात इतर काही वेगळेपण आहे का हे तपासण्यासाठी इतरही चाचण्या कराव्या लागू शकतात. असं दिसून येतं, की जननेंद्रियांत वेगळेपण असलेल्या अंदाजे २७% जणांमध्ये इतरही शारीरिक वेगळेपण आढळतं. यात मुख्यतः मूत्रपिंडाच्या कार्य/रचनेत, मणक्यात/कंबरेच्या हाडात (खुबा), सेन्ट्रल नर्व्हस सिस्टिम (C.N.S.) इत्यादी मध्ये वेगळेपण दिसू शकतं. [1]
इंटरसेक्स बाळाच्या लिंगाचा अंदाज लावणं
 बाळाला लिंग कोणतं द्यायचं याची मार्गदर्शक तत्त्वे विविध डॉक्टरांनी दिली आहेत. उदाहरणादाखल, डॉ. मिल्टन डायमंड यांनी दिलेली काही मार्गदर्शक तत्त्वे पुढे मांडली आहेत. [2]
• पुढील परिस्थितीत बाळाला मुलगा म्हणून वाढवावं-
• लिंग गुणसूत्र XY +AIS (Grade 1 to 3)
• लिंग गुणसूत्र xx + CAH + जुळलेले भगोष्ट + मोठी शिस्निका (Clitoromegaly)
• क्लिनफेल्टर सिंड्रोम असलेल्या व्यक्ती.
• लिंग गुणसूत्र XY + खूप छोटं लिंग (Micropenis)

• लिंग गुणसूत्र XY+ (5- रिडक्टेज/178 रिडक्टेज ची कमतरता)

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ५०