पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वृषणांमध्ये कर्करोग होण्याची शक्यता असते. AISचे विविध प्रकार आहेत- पार्शल AIS, कम्प्लीट AIS इ.
• AMH ची निर्मिती न होणं
 मुलामध्ये लिंग गुणसूत्र XY असतात व गर्भाची वाढ होताना मुलाचेवृषण AMH स्राव निर्माण करतात. AMHमुळे मुलेरियन रचनेचा नाश होतो. जर काही कारणास्तव AMH ची निर्मिती झाली नाही/योग्यवेळी AMH ची निर्मिती झाली नाही/AMH स्रावाची निर्मिती झाली पण तो स्राव मुलेरियन रचनेवर परिणाम साधू शकला नाही तर मुलेरियन रचनेचा नाश होत नाही. आंतरिक जननेंद्रियांमध्ये गर्भाशय, स्त्रीबीजवाहिन्या व काही अंशी योनीची निर्मिती होते. बाह्य जननेंद्रिय मुलाची असतात. काहींमध्ये क्रिप्टॉरचिडिझम दिसतं.
• विशिष्ट औषधं/विशिष्ट आजार
 जर गर्भवती स्त्रीने काही विशिष्ट औषधं घेतली किंवा तिला विशिष्ट प्रकारचा ट्युमर असला (ज्यामुळे अॅन्ड्रोजेन्सची जास्त प्रमाणात निर्मिती होते) तर त्याचा परिणाम गर्भाच्या जननेंद्रियांच्या वाढीवर होऊ शकतो व त्यामुळे जननेंद्रियात वेगळेपण येऊ शकतं. उदा., जर गर्भवती स्त्रीचा गर्भ

मुलीचा असेल व त्या स्त्रीने मोठ्या प्रमाणात अँड्रोजेन संप्रेरकं निर्माण करणारी औषधं घेतली तर गर्भवती स्त्रीच्या वाढलेल्या अँड्रोजेन संप्रेरकांमुळे गर्भाची शिस्निका आकाराने मोठी तयार होऊ शकते (क्लिटोरोमेगॅली), भगोष्ट काही प्रमाणात जुळलेले असू शकतात.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ४८