पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लक्षणं दिसू लागतात. याला 'लेट-ऑनसेट' CAH म्हणतात. या मुलांमध्ये लहानपणीच (खूप लवकर) तारुण्याची लक्षणं दिसू लागतात- उदा., बगलेत केस येणं/दाढी-मिशा येणं, जननेंद्रियांची वाढ होणं इत्यादी.
• टेस्टोस्टेरॉनपासून DHT तयार न होणं
 टेस्टोस्टेरॉनपासून DHT तयार होण्यासाठी 5 cc रिडक्टेस एन्झाइमची गरज असते. मुलामध्ये ही एन्झाइम तयार झाली नाही किंवा कमी प्रमाणात तयार झाली तर त्या मुलाची आंतरिक जननेंद्रिय मुलाची तयार होतात पण DHT योग्य प्रमाणात तयार न झाल्यामुळे बाह्य जननेंद्रियं पूर्णपणे विकसित होत नाहीत.
• अॅन्ड्रोजेन्सचा वापर न करता येणं (Androgen Insensitivity Syndrome-AIS).
 मुलाची लिंग गुणसूत्र XY असतात व गर्भाची वाढ होऊ लागते तसं वृषण अॅन्ड्रोजेन संप्रेरकं तयार करू लागतात. काही जणांमध्ये असं दिसतं, की काही गुणसूत्रांच्या विशिष्ट जीन्समधील वेगळेपणामुळे पेशींमध्ये 'अॅन्ड्रोजेन रिसेप्टर्स' (म्हणजे अॅन्ड्रोजेन संप्रेरकांचा वापर करण्याची यंत्रणा) कमी प्रमाणात निर्माण होतात किंवा पेशींच्या 'अॅन्ड्रोजेन रिसेप्टर' यंत्रणेला अॅन्ड्रोजेन संप्रेरकांचा वापर करता येत नाही. म्हणून अॅन्ड्रोजेन्सची निर्मिती होऊनसुद्धा, त्याचा जननेंद्रियांच्या घडणीवर प्रभाव पडत नाही किंवा कमी प्रमाणात प्रभाव पडतो. याचा जननेंद्रियांच्या वाढीवर परिणाम होतो. किती प्रमाणात 'अॅन्ड्रोजेन रिसेप्टर' यंत्रणा तयार आहे व कार्यशील आहे यावर जननेंद्रियांची वाढ अवलंबून असते.

 AMHमुळे मुलेरियन रचनेचा नाश होतो. वुल्फियन रचनेचा विकास होत नाही. बाह्य जननेंद्रिय मुलीची घडतात. बहुतेक वेळा वृषण पोटातच राहतात (क्रिप्टॉरचिडिझम) कारण ते वृषण वृषणकोशात उतरण्यासाठी अॅन्ड्रोजेन्सचा वापर व्हावा लागतो जो होत नाही. या पोटात राहिलेल्या

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ४७