पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जर गर्भ मुलीचा असेल (लिंग गुणसूत्र XX) तर अॅन्ड्रोजेन्सची निर्मिती जास्त झाल्यामुळे, शिस्निका मोठ्या आकाराची तयार होते (Clitoromegaly), मोठे/छोटे भगोष्ट जुळलेले असतात.
 जर गर्भ मुलाचा असेल (लिंग गुणसूत्र XY) तर सहसा लहानपणी वेगळेपण लक्षात येत नाही, पण यातील अनेक मुलं खूप लवकर तारुण्यात प्रवेश करतात.
 CAH असलेल्या व्यक्तींची उंची कमी राहाते. शरीरात टेस्टोस्टेरॉन/इस्ट्रोजेन संप्रेरकांचं प्रमाण योग्य राहावं व शरीराची वाढ योग्य त्या प्रकारे व्हावी यासाठी औषधं घ्यावी लागतात.
 मुलगा असो वा मुलगी असो CAHचे दोन मुख्य प्रकार आहेत-
(a) 'क्लासिकल' CAH
 जर नवजात बालकात CAHची लक्षणं लगेच दिसत असतील तर त्याला 'क्लासिकल' CAH म्हणतात. याचे दोन प्रकार आहेत- 'सॉल्ट वेस्टिंग' CAH व नॉन-सॉल्ट वेस्टिंग' CAH.
 काहींमध्ये 'सॉल्ट वेस्टिंग' दिसत नाही, तर काहींमध्ये 'सॉल्ट वेस्टिंग' दिसतं. काही नवजात बालकांमध्ये कॉर्टिसॉलबरोबर अल्डोस्टेरॉन रसायन कमी प्रमाणात तयार होतं. याच्यामुळे शरीरातील सोडियम व पाण्याचं प्रमाण कमी होऊ लागतं. याला 'सॉल्ट वेस्टिंग' म्हणतात. 'सॉल्ट वेस्टिंग'ची लक्षणं- जन्माला आलेल्या मुलाला किंवा मुलीला उलट्या होतात, वजन घटतं व काही आठवड्यातच ते बाळ दगावतं. जर 'सॉल्ट वेस्टिंग'ची लक्षणं दिसली तर त्या बाळाला वाचवण्यासाठी ताबडतोब औषधोपचार करावे लागतात.
(b) 'लेट-ऑनसेट' CAH

 काही वेळा बाळाला CAH आहे हे लक्षात येत नाही. त्याची लक्षणं दिसत नाहीत पण बाळ मोठं होऊ लागलं, की त्याच्यात CAHची काही

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ४६