पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

  xx व काही पेशींमध्ये एकच X लिंग गुणसूत्र असतं (मोसाइसिझम). या मुलींमध्ये गोनाड्सचं रूपांतर स्त्रीबीजांडात झालेलं नसतं.
 काहींमध्ये हे वेगळेपण जन्मल्यावर लक्षात येतं. हातापायांना सूज (लिंफिडेमा), रुंद मान (वेब्ड नेक), अशी काही लक्षणं दिसतात.
 काही जणांमध्ये मात्र हे वेगळेपण तारुण्यात लक्षात येतं. तारुण्यात योनी व गर्भाशयाची वाढ होत नाही, पाळी येत नाही व स्तन वाढत नाहीत. उंची सरासरीपेक्षा कमी राहाते. हे वेगळेपण लक्षात आल्यावर, तारुण्यात, जननेंद्रियांची वाढ होण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इस्ट्रोजेन थेरपी घ्यावी लागते.



@ U.S. National Library of Medicine


लिंग गुणसूत्र

ऑटोसोमस्

(B) SRY जीनचं वेगळेपण


• XY फीमेल सिंड्रोम (Swyer Syndrome) (Gonadal Dysgenesis)

 क्वचित वेळा असं दिसतं, की लिंग गुणसूत्र XY असतात पण Y

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ४१