पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतं.
 जननेंद्रियांच्या वेगळेपणाचे काही प्रकार पुढे दिले आहेत. यातील काही प्रकार इंटरसेक्स वर्गात मोडतात (उदा., टू-हरमॅफ्रोडाइट, AIS इ.) तर काही प्रकार इंटरसेक्स वर्गात मोडत नाहीत (उदा., क्लिनफेल्टर सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, लेट ऑनसेट' CAH इ.).
    (A) लिंग गुणसूत्रांच्या संख्येतील वेगळेपण
 काही वेळा पुरुषबीजाने स्त्रीबीजाला फलित करताना लिंग गुणसूत्रांच्या संख्येमध्ये किंवा रचनेमध्ये वेगळेपण येतं. म्हणजे मुलीच्या पेशींमध्ये लिंग गुणसूत्र XX व मुलाच्या पेशींमध्ये लिंग गुणसूत्र XY अशी जोडी न होता इतर रचना होतात.याचे काही प्रकार पुढे दिले आहेत.
• क्लिनफेल्टर सिंड्रोम (Klienfelter Syndrome)
 क्वचित वेळा मुलाच्या पेशींमध्ये लिंग गुणसूत्रात एकापेक्षा जास्त x गुणसूत्र असतं. उदा., मुलाच्या पेशींमध्ये लिंग गुणसूत्र XY असण्याऐवजी XXY असतात. तर क्वचित वेळा असं दिसतं, की त्या मुलाच्या काही पेशींमध्ये लिंग गुणसूत्र XY असतात तर काही पेशींमध्ये लिंग गुणसूत्र XXY असतात (मोसाइसिझम).
 लहान असताना अशा मुलामध्ये वेगळेपण आहे हे समजणं अवघड असतं. जेव्हा तो मुलगा तारुण्यात येतो तेव्हा उंची सरासरीपेक्षा जास्त होते, वृषणांची वाढ होत नाही. वृषणांत खूप कमी प्रमाणात पुरुषबीजं तयार होतात. काही जणांचं लिंग खूप छोटं राहातं (मायक्रोपेनिस). काहींचे स्तन वाढतात. काहींमध्ये टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाचं प्रमाण कमी आढळतं. काहींमध्ये बौद्धिक विकास कमी प्रमाणात झालेला दिसतो.
• टर्नर सिंड्रोम (Turner Syndrome) (Gonadal Dysgenesis)
 क्वचित वेळा मुलीच्या पेशींमध्ये लिंग गुणसूत्र xx असण्याऐवजी

एकच X असतं. तर काहींमध्ये असं दिसतं, की काही पेशींमध्ये लिंग गुणसूत्र

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ४०