पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५. जननेंद्रियांतील वेगळेपण


 आपण पहिल्या सत्रात बघितलं, की ज्या व्यक्तीमध्ये गुणसूत्र किंवा गोनाड्स किंवा साव/संप्रेरकांच्या वेगळेपणामुळे काही अंशी पुरुषाची बाय/आंतरिक जननेंद्रिय असतात व काही अंशी स्त्रीची बाह्य/आंतरिक जननेंद्रिय असतात अशा व्यक्तींना इंटरसेक्स म्हटलं जातं. पूर्वी इतर शब्द वापरले जायचे-'टू-हरमॅफ्रोडाइट', 'सूडो-हरमॅफ्रोडाइट' इत्यादी. हे शब्द आता सहसा वापरले जात नाहीत. काही डॉक्टर्स 'डिसऑर्डर ऑफ सेक्शुअल डिफरन्सिएशन' (DSD) असा वाक्प्रचार करतात. पण हा वाक्प्रचार काही अॅक्टिव्हिस्ट्सना मान्य नाही, कारण 'डिसऑर्डर' हा शब्द नकारात्मक आहे, असहिष्णू आहे. त्यामुळे आता इंटरसेक्स हा शब्द वापरला जातो. इंटरसेक्ससाठी मराठीत काहीवेळा 'द्विलिंगी' असा शब्द वापरला जातो.
 इंटरसेक्स व्यक्तींमधील जननेंद्रियांतील वेगळेपण असो किंवा इंटरसेक्स वर्गात न बसणारं जननेंद्रियांतील वेगळेपण असो, या वेगळेपणाचं मूळ हे गुणसूत्र किंवा गोनाड्स किंवा स्राव/संप्रेरकांच्या वेगळेपणात असतं.
इंटरसेक्स व जननेंद्रियांतील इतर वेगळेपण यातील फरक
 जननेंद्रियांतील प्रत्येक वेगळेपण इंटरसेक्स या वर्गात मोडत नाही. उदा., मुलाला फक्त हायपोस्पेडिया असेल किंवा त्याचे वृषण वृषणकोशात उतरलेले नसतील (क्रिप्टॉरचिडिझम) तर याचा अर्थ तो मुलगा इंटरसेक्स आहे असं नाही, कारण जननेंद्रियांत वेगळेपण असलं तरी ते बाळ मुलगा आहे

यात शंका नसते. एखाद्या व्यक्तीच्या बाह्य किंवा आंतरिक जननेंद्रियात जर पुरुष व स्त्री या दोन्हीच्या जननेंद्रियांचा अंश असेल तरच त्या व्यक्तीला इंटरसेक्स म्हटलं जातं. काहींच्या बाबतीत त्यांच्या जननेंद्रियांतील वेगळेपणावरून त्या व्यक्तीला इंटरसेक्स म्हणायचं का? हे ठरवणं अवघड

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ३९