पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हायपोस्पेडिया
 मुलांमध्ये शिश्नमुंडाच्या टोकाला लघवी व वीर्य बाहेर सोडण्यासाठी मूत्रमार्गाचं छिद्र असतं. क्वचित वेळा लिंगाची नळी तयार होताना मूत्रमार्ग पूर्ण तयार होत नाही व मूत्रमार्गाचं छिद्र लिंगाच्या टोकाला न बनता अलीकडे लिंगाच्या खालच्या भागात बनतं. याला हायपोस्पेडिया म्हणतात. हे छिद्र लिंगाच्या टोकापासून ते लिंगाच्या देठापर्यंतच्या खालच्या भागात कुठेही असू शकतं.

हायपोस्पेडिया हायपोस्पेडिया नाही


 हायपोस्पेडियाबरोबर काहीजणांच्या लिंगाला बराच बाकही दिसतो. वीर्यनिर्मिती व पुरुषबीजनिर्मितीत कोणतीही अडचण नसते. या समस्येवर डॉक्टर काहीजणांना शस्त्रक्रियेचा सल्ला देतात, ज्यात हे छिद्र बंद करून शिस्नमुंडापर्यंत मूत्रमार्ग वाढवून हे छिद्र शिस्नमुंडाच्या टोकाशी बनवलं जातं.
 हायपोस्पेडिया होण्याची सर्व कारणं माहीत नाहीत, पण जर गर्भात टेस्टोस्टेरॉन/DHTची कमतरता असेल किंवा लिंगाची घडण होताना, टेस्टोस्टेरॉन/DHTचा पुरेसा वापर पेशींना करता आला नाहीतर हायपोस्पेडिया होण्याची शक्यता असते.
मायक्रोपेनिस (खूप छोटं लिंग)

 पूर्ण वाढ झालेल्या नवजात मुलाच्या (Term new born male) लिंगाची (शिस्न) ताणलेली (stretched) लांबी १.९ सें.मी.पेक्षा कमी असेल

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ३७