पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 -दोन वीर्यकोश तयार होतात
 टेस्टोस्टेरॉनवर 5-cc रिडक्टेज एन्झाइमची (रसायनाची) प्रक्रिया होते व त्यापासून DHT (डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन) तयार होतं. DHT रसायनाच्या प्रभावामुळे बाह्य जननेंद्रियं घडतात.
बाह्य जननेंद्रियांची घडण
 • जेनायटल ट्यूबरसीलपासून शिस्नमुंडाची निर्मिती होते.
 • युरोजनायटल फोल्ड्सपासून लिंगाची निर्मिती होते.
 • लेबियोस्क्रोटल स्वेलिंग्जपासून वृषणकोश तयार होतात.
 • युरोजनायटल सायनसपासून पुरस्थ ग्रंथी घडते.
 जर टेस्टोस्टेरॉन/DHT कमी प्रमाणात तयार झालं तर जननेंद्रियांची वाढ पूर्णपणे होत नाही.
 तारुण्यात आल्यावर FSH व टेस्टोस्टेरॉनच्या प्रभावामुळे व वृषणांतील सर्टोली पेशींचा आधार घेऊन वृषणांतील स्परमॅटोगोनियांपासून पुरुषबीजांची निर्मिती होऊ लागते.


टेस्टोस्टेरॉन . 5- रिडक्टेज , मूत्राशय DHT पुरस्थ ग्रंथी वीर्यकोष लिंग पुरुषबीजवाहिनी एपिडिडिमीस वृषण

वृषणकोष

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ३६