पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुरुषबीजानी स्त्रीबीज फलित केलं तर मुलगा होतो; जर २३वं गुणसूत्र X असणाऱ्या पुरुषबीजानी स्त्रीबीज फलित केलं तर मुलगी होते. म्हणजे, गर्भ मुलाचा बनणार की मुलीचा बनणार हे फलित बीजाच्या लिंग गुणसूत्रांवर ठरतं. लिंग गुणसूत्र जर XY असतील तर मुलाची जननेंद्रिय घडतात. लिंग गुणसूत्र जर XX असतील तर मुलीची जननेंद्रिय घडतात.
स्त्रीबीज पुरुषबीज गर्भाचं लिंग XX मुलगी X


X + X % 3D लिंग गुणसूत्र लिंग गुणसूत्र + Y % 3D XYमुलगा



 याच्यावरून स्पष्ट आहे, की मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे स्त्रीच्या हातात अजिबात नाही. दुसरी गोष्ट, कोणतं पुरुषबीज स्त्रीबीजाला फलित करेल हे पुरुषालाही ठरवता येत नाही. म्हणूनच गर्भ मुलीचा होणार की

मुलाचा होणार हे दोघांच्याही हाती नसतं.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख २९