पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुरुषबीज गर्भाशय स्त्रीबीज -स्त्रीबीजांड ODDDDDDD । REAAMPUC010



गर्भधारणा

 फलित झालेलं बीज, स्त्रीबीजवाहिनीतून गर्भाशयाकडे सरकू लागतं. गर्भाशयाकडे जाताना त्या फलित बीजाचं विभाजन होऊन एकाचे दोन, दोनाच्या चार अशा पेशी वाढायला लागतात. गर्भाशयात पोहोचल्यावर या पेशींचा गोळा गर्भाशयात रुजतो व तिथे गर्भ वाढू लागतो.
गर्भाचं लिंग
 जेव्हा पुरुषबीज व स्त्रीबीज यांचं मीलन होतं तेव्हा फलित झालेल्या बीजात स्त्रीची व पुरुषाची गुणसूत्र एकत्र येतात. म्हणजे फलित झालेल्या बीजात परत ४६ गुणसूत्रं (२३ जोड्या) तयार होतात. या गुणसूत्राच्या जोड्या होणाऱ्या गर्भाचा नकाशा बनतात. (बाळाने कुरळे केस बाबाकडून घेतलेत व गोरा रंग आईकडून घेतला याचा अर्थ आता लक्षात येतो). या गुणसूत्रातील २३वी जोडी मुलगा होणार की मुलगी होणार हे ठरवते. म्हणून

या २३व्या जोडीला लिंग गुणसूत्र म्हणतात. जर २३वं गुणसूत्र Y असणाऱ्या

इंटरसेक्स :एक प्राथमिक ओळख २८