पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४. जननेंद्रियांची घडण


गर्भाची वाढ
 गर्भाशयात जसा गर्भ वाढू लागतो तसं मातेच्या शरीरातील संप्रेरकांच्या प्रमाणात खूप बदल व्हायला लागतात, त्यामुळे तिला मळमळायला होणं, उलट्या होणं, चिडचिड होणं, नैराश्य येणं, खूप आनंद होणं असे शारीरिक/भावनिक चढ-उतार जाणवतात.
 पहिले २० आठवडे गर्भाचे विविध अवयव घडत असतात. २०-३२ आठवड्यात गर्भाच्या अवयवांची घडण व त्यांची वाढ होते. ३२व्या आठवड्यापासून ते प्रसूतीपर्यंत गर्भाची वाढ होते व त्याचे विशिष्ट अवयव सक्षम बनत राहतात.
बोंडांची निर्मिती
 गर्भ मुलाचा असो किंवा मुलीचा असो, दोघांमध्येही बोंडांची निर्मिती करणारी रचना बनते. गर्भाची वाढ होऊ लागल्यावर, पहिल्या महिन्यात शरीराच्या दोन बाजूला बगलेच्या जवळून, पोटावरून खाली कंबरेपर्यंत जाणाऱ्या विशिष्ट पेशींच्या रेषा 'मॅमरी रिजेस' तयार होतात. छातीवरच्या दोन जागा वगळता या पेशी हळूहळू कमी होऊ लागतात. छातीवरच्या दोन

भागातल्या या उरलेल्या पेशींपासून बोंडांची निर्मिती होते.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ३०