पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुरुषबीजं व स्त्रीबीजं
 आपण पाहिलं, की मानवी शरीराच्या प्रत्येक पेशीत ४६ गुणसूत्र असतात. पुरुषबीजं व स्त्रीबीजं मात्र अपवाद आहेत. स्त्रीबीजं व पुरुषबीजं यांची निर्मिती होते तेव्हा प्रत्येक पुरुषबीजात व प्रत्येक स्त्रीबीजात फक्त अर्धी गुणसूत्र असतात (२३ गुणसूत्र). प्रत्येक स्त्रीबीजातलं २३वं गुणसूत्र कायम X असतं. प्रत्येक पुरुषबीजामधील २३वं गुणसूत्र x किंवा Y असू शकतं. याचा अर्थ कोट्यवधी पुरुषबीजांमधील अंदाजे अर्ध्या पुरुषबीजांत २३वं गुणसूत्र X असतं व बाकीच्या अर्ध्या पुरुषबीजांत २३वं गुणसूत्र Y असतं.
गर्भधारणा
 लिंग-योनी संभोगात पुरुष स्त्रीच्या योनीत आपलं उत्तेजित लिंग घालून संभोग करतो. संभोगाच्या शेवटी पुरुषाचं वीर्यपतन स्त्रीच्या योनीत


योनी गर्भाशय लिंग


होतं व वीर्य आणि पुरुषबीजं स्त्रीच्या योनीत सोडली जातात. योनीतून पुरुषबीजं आपल्या शेपटीच्या साहाय्यानं पुढे सरकायला लागतात व योनीतून, गर्भाशयमुखातून गर्भाशयात व तिथून स्त्रीबीजवाहिन्यात जातात.
 स्त्रीबीजवाहिनीत जर परिपक्व स्त्रीबीज असेल व एखादं पुरुषबीज त्या स्त्रीबीजाला मिळालं तर पुरुषबीज स्त्रीबीजाला भोक पाडून आत शिरतं व

स्त्रीबीज फलित होतं.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख २७