पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रचनेमध्ये बदल झाला तर त्या पेशीच्या कार्यातही बदल होतो.
 समजायला सोपं जावं म्हणून एक ढोबळ उपमा घेऊ. एखादी पाककृती तयार करायची असेल तर आपण पाककलेच्या पुस्तकातली त्या पदार्थाची रेसिपी' असलेलं पान उघडतो. त्या पानावर तो पदार्थ कसा बनवायचा याच्या सूचना मांडलेल्या असतात. म्हणजे तुलनात्मकदृष्ट्या एक सूचना म्हणजे एक जीन (विशिष्ट रसायनांची रचना). अशा विविध सूचनांचं एक पान म्हणजे एक गुणसूत्र व अशी ४६ पानं म्हणजे ४६ गुणसूत्रं. आपण एखादा पदार्थ तयार करत असलो, की आपण आपल्याला पाहिजे असलेल्या विशिष्ट रेसिपीचं पान उघडतो व त्यातील विशिष्ट सूचना वाचतो व त्याप्रमाणे ती कृती करतो. जर काही कारणांनी त्या पानावरच्या सूचनेत बदल झाला असेल तर आपल्या कृतीतही बदल होतो.
मोसाइसिझम
 माणसाच्या प्रत्येक पेशीत सहसा ४६ गुणसूत्रं असतात (२३ जोड्या). पण क्वचितवेळा एखाद्या व्यक्तीच्या विविध पेशींमध्ये वेगवेगळी गुणसूत्रांची संख्या असते. याला मोसाइसिझम म्हणतात. उदा., एखादया व्यक्तीच्या काही पेशींमध्ये लिंग गुणसूत्र XX असतील तर काहींमध्ये एकच X असेल. म्हणजेच त्या व्यक्तीच्या काही पेशींमध्ये गुणसूत्रांचा आकडा ४६ आहे, तर काही पेशीमध्ये गुणसूत्रांचा आकडा ४५ आहे.

४६ गुणसूत्रं


४५ गुणसूत्रं

©U.S. National Library of Medicine

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख २६