पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुलगी वयात येताना
 मुलगी वयात आली, की अंदाजे दर महिन्याला दोघापैकी कोणत्या तरी एका बीजांडातील एक स्त्रीबीज FSH च्या प्रभावामुळे परिपक्व होतं व ते LHच्या प्रभावामुळे बीजांडातून बाहेर येतं.
 स्त्रीबीजातून इस्ट्रोजेन संप्रेरक स्रवतं व स्त्रीबीजाच्या 'कॉर्पस ल्युटियम'मधून प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्रवतं. इस्ट्रोजेनमुळे जननेंद्रियांची वाढ होते व शरीराला गोलाई येते. इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांच्या प्रभावामुळे गर्भाशयाच्या आतील भागात विशिष्ट पेशींचा थर तयार होतो.
 स्त्रीबीजांडातून बाहेर आलेलं परिपक्व स्त्रीबीज स्त्रीबीजवाहिनीच्या 'फिंब्रे'त अडकतं व हे बीज स्त्रीबीजवाहिनीत येतं. स्त्रीबीजवाहिनीतून हे बीज हळूहळू गर्भाशयाकडे सरकायला लागतं. गर्भधारणा झाली नाहीतर गर्भाशयातील विशिष्ट पेशींच्या थराची जरूर राहत नाही व महिन्याअखेर तो थर गळायला लागतो. गर्भाशयातील या विशिष्ट पेशी, रक्त हळूहळू योनीतून बाहेर येतं. हे कार्य सरासरी ३ ते ५ दिवस चालतं. पुढच्या महिन्यात परत एक स्त्रीबीज परिपक्व होतं व परत गर्भाशयात विशिष्ट पेशींचा थर तयार व्हायला लागतो. हे चक्र सरासरी २८ दिवसांनी एकदा येतं म्हणून त्याला 'मासिक चक्र' किंवा 'मासिक पाळी' म्हणतात. गर्भधारणा, बाळंतपणाचा काळ व स्तनपानाचा काळ सोडला, तर ही मासिक पाळी रजोनिवृत्तीपर्यंत चालू राहते. FSH, LH, इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांच्या प्रभावावर मासिक पाळी चक्र अवलंबून असतं.

रजोनिवृत्ती

 स्त्रीच्या उतार वयात, म्हणजे अंदाजे ४५-५०च्या आसपास स्त्रीबीजांडं सुकू लागतात, त्यांच्यात इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन संप्रेरकं तयार होण्याचं प्रमाण कमी होतं. स्त्रीची पाळी अनियमित व्हायला लागते. दोन-

तीन महिन्यांतून एखादयावेळी पाळी येणं, महिन्यात अधेमध्ये रक्त जाणं असं

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख २२