पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(फिंब्रे म्हणजे जशी हाताच्या पंजाला बोटं असतात तशी अनेक पातळ बोटं असतात.)
स्त्रीबीजांड : स्त्रीच्या शरीरात दोन स्त्रीबीजांड असतात. ही बीजांड 'फिंब्रे च्या जवळ असतात. जन्मत:च या बीजांडात असंख्य स्त्रीबीजं असतात. ही स्त्रीबीजं परिपक्व नसतात (म्हणजे ती कच्ची असतात.). या बीजांडात इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन संप्रेरकं तयार होतात. स्त्रीची लैंगिक इच्छा, मासिक पाळी, गर्भधारणेचा या संप्रेरकांशी संबंध असतो.


तारुण्यात प्रवेश

सरासरी ११-१३ वर्षांत मुली व सरासरी १३-१४ वर्षांत मुलं वयात येतात. वयात येताना मुलामुलींच्या शरीरात विविध शारीरिक व मानसिक बदल होऊ लागतात. त्यांचा लैंगिक पैलू जन्म घेतो व लैंगिक इच्छा उत्पन्न होऊ लागतात.

तारुण्यात होणारे शारीरिक बदल

मुलांमधील शारीरिक बदल : जननेंद्रियांच्या आकारात वाढ होते, उंची वाढते, खांदे रुंदावतात, स्नायू बळकट होतात, आवाज फुटतो, काखेत व जननेंद्रियांभोवती केस येतात, दाढी-मिशा येतात, वीर्यनिर्मिती सुरू होते.

मुलींमधील शारीरिक बदल : जननेंद्रियांच्या आकारात वाढ होते, उंची वाढते, शरीराला गोलाई येते, स्तन वाढतात, काखेत व जननेंद्रियांभोवती केस येतात, मासिक पाळी सुरू होते.

ग्रंथी व संप्रेरक

 आपल्या शरीरात काही ग्रंथी आहेत ज्या विशिष्ट संप्रेरक (स्राव) निर्माण करतात. हे संप्रेरक नलिकांवाटे किंवा रक्तातून शरीरात इतर

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख १८