पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्त्रीचे जननेंद्रिय


मोठं व छोटं भगोष्ट : चित्रात जो मांसल भाग दाखवला आहे, त्याला मोठं भगोष्ट म्हणतात. याचे ओठं उघडले, की आतील मांसल भाग दिसतो. याला छोटं भगोष्ट म्हणतात.
शिस्निका (क्लिटोरिस) : मूत्रमार्गमुखाच्या थोड्या वरच्या बाजूला दाण्यासारखा दिसणारा अवयव आहे. याला शिस्निका म्हणतात. हिच्यावर एक त्वचा असते.
 शिस्निकेत खूप मोठ्या प्रमाणात चेतातंतू (नर्व्हज) असतात. म्हणून ती अत्यंत संवेदनशील आहे. तिला स्पर्श करून लैंगिक उत्तेजना व सुख मिळण्यास मदत होते.लैंगिक उत्तेजना झाली, की या अवयवात जास्त रक्तपुरवठा केला जातो व हा अवयव फुगतो. लैंगिक उत्तेजना गेली, की त्यातील रक्तप्रवाह कमी होतो व शिस्निकेची उत्तेजना जाते. (शिस्निकेतून वीर्य येत नाही. स्त्रियांमध्ये वीर्य तयार होत नाही.) बोली भाषेत शिस्निकेला 'दाणा' म्हणतात.



स्त्रीबीजवाहिनी फॅिब्रे स्त्रीबीजांड मूत्रमार्ग -ग्रीवा शिस्निका गर्भाशय योनिमार्ग - मूत्रमार्गमुख छोटं भगोष्ट मोठं भगोष्ट योनिमुख बारथोलिन ग्रंथी

गुदद्वार

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख १६